लष्कराची जागा बिल्डरला विकली !

January 13, 2011 9:32 AM0 commentsViews: 7

13 जानेवारीमुंबईत आदर्श सोसायटी घोटाळ्या सारखचं आणखी एक प्रकरण उघड झालं हे प्रकरण आहे कांदिवलीतल्या लष्कराच्या जमिनीचं. कांदिवलीत मोक्याच्या जागी असलेली लष्कराची एक एकर जमीन एका खासगी बिल्डरला देण्यात आली.मात्र ही जागा लष्कराच्या ताब्यात होती. लष्कराला 99 वर्षांच्या करारानं ही जागा देण्यात आली होती. मात्र त्यासाठीचे पैसे लष्करानं न भरल्यानं ही जागा राज्य सरकारनं ताब्यात घेतली. 1999 मध्ये काही बिल्डर्स ही जागा घेण्यासाठी सरकारकडे गेले. राज्य सरकारने लष्कराकडे ही जागा दुसर्‍यांना देण्याबद्दल तुमचे काही आक्षेप आहेत का अशी विचारणा केली मात्र 2007 पर्यंत लष्कराकडून त्याचं उत्तर देण्यात आलं नाही नंतर राज्य सरकारनं ती जमीन 5 कोटी 94 लाखाला एका बिल्डरला दिली. लष्करानं या जमिनीवर आपला दावा का सांगितला नाही. हे दुर्लक्ष होतं की एक सुनियोजित कट होता? राज्य सरकारनं जमीन विकण्याची घाई का केली. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.हे प्रकरण पुढं आल्यानंतर संरक्षण मंत्रालयानं या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.या चौकशीचा प्राथमिक अहवाल लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांना सादर करण्यात आला. आदर्श प्रकरणात सहभागी असलेले काही अधिकारी,यात घोटाळ्यातही सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो.

close