शेतकर्‍यांनी भाजीपाला थेट ग्राहकांना विकावा- कृषीमंत्री

January 13, 2011 9:43 AM0 commentsViews: 9

13 जानेवारी

शेतकर्‍यांनी भाजीपाला थेट ग्राहकांना विकावा असं आवाहन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं.गरज पडल्यास विक्रेत्या शेतकर्‍यांना पोलिस संरक्षण देऊ असं आश्‍वासनंही विखे यांनी दिलं. महागाईच्या मुद्द्याचा गैरवापर करून अनेक किरकोळ व्यापारी नफेखोरपणा करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला चढ्या दरानेच घ्यावा लागतोय. त्यात शेतकर्‍यांच्या पदरातही काही पडत नाही. त्यामुळेच आता थेट कृषीमंत्र्यांनीच शेतकर्‍यांना भाजीपाला व्यापार्‍यांकडे देण्याऐवजी थेट ग्राहकांनाच विकण्याचं आवाहन केलं आहेत.

close