कांदा फुकट घ्या !

January 13, 2011 9:53 AM0 commentsViews: 2

13 जानेवारी

सध्या कांद्याने सर्वसामान्य नागरीकांचा मोठा वांदा केला. बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो मिळणारा कांदा घाटकोपरमध्ये चक्क फुकट वाटला जातोय. महागाईमुळे सर्वसामान्यांना कांदा विकत घेणं कठीण झालं आहे. त्यामुळे घाटकोपरमध्ये मनसेचे आमदार राम कदम यांनी त्यांच्या मतदारसंघात कांदा फुकट वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आज सकाळपासून त्यांनी सर्वसामान्या नागरीकांना रेशन कार्ड दाखवल्यावर प्रत्येकी तीन किलो कांदे फुकट वाटण्यास सुरवात केली. त्यामुळे घाटकोपरमधील नागरीक प्रचंड खुष झाले आहेत.

close