मनसे आमदार प्रकरणी विरोधकांनी करायची ती टीका करु द्या -मुख्यमंत्री

January 13, 2011 10:01 AM0 commentsViews: 5

13 जानेवारी

कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेली मारहाण दुदैर्वी आहे. या प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करीत आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी विरोधकांनी करायची ती टीका करु द्या असं मुख्यमंत्री म्हणाले. आमदार जाधव मारहाण प्रकरणावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईत मॅजेस्टिक प्रकाशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर त्यांनी जाधव मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

close