साध्वी प्रज्ञासिंगला कोर्टात आणलं

November 3, 2008 3:33 AM0 commentsViews: 5

3 नोव्हेंबर,नाशिक मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग आणि इतर दोघांना नाशिकच्या कोर्टात आणलं आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर सुनावणीदरम्यान चक्कर येऊन पडली आहे. नाशिकच्या कोर्टात नेण्यापूर्वी या सगळ्यांची केईएम हॉस्पिटलमध्ये मेडिकल चाचणी करण्यात आली होती. या तिघांना कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणी साध्वीची नार्को टेस्टही झाली आहे. या बॉम्बस्फोटप्रकरणी आत्तापर्यंत एटीएसनं 5 लोकांना अटक केली आहे. त्यात एक माजी लष्करी अधिकारी आहे. याप्रकरणी एटीएसनं एका लष्करी अधिकार्‍यांची चौकशीही केली तसंच अभिनव भारतच्या खजिनदारालाही नुकतंच ताब्यात घेतलं.दरम्यान, नाशिक कोर्टाच्या आवारात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. याप्रकरणी शिवसेना आणि आरएसएसनं साध्वीच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय. साध्वी आणि तिच्या साथीदारांना पाठींबा देण्यासाठी हिंदू बांधवांनी कोर्टासमोर मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन करणारी फलक शिवसेनेनं लावली आहेत आणि साध्वीला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमलेत. याबाबत बोलताना शिवसेनेचे महानगर प्रमुख निलेश चव्हाण म्हणाले, शिवसैनिक नैतिक समर्थन देण्यासाठी इथेआले आहेत. कायदेशीर मदतीची गरज साध्वीला लागल्यास ती आम्ही देणार आहोत '.

close