भारताचा 135 रन्सनं पराभव

January 13, 2011 10:19 AM0 commentsViews: 1

13 जानेवारी

वर्ल्डकप आधीच्या शेवटच्या वन डे सीरिजमध्ये भारताची सुरूवात अपयशी झाली. डरबन येथील पहिल्या वनडेतं दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 135 रन्सनं पराभव केला. भारताविरुध्दच्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला खरा पण टीमला चांगली सुरूवात करुन देण्यात ग्रॅहम स्मिथ आणि हशिम अमला अपयशी ठरला. कॅप्टन स्मिथ नेहराचा पहिला बळी ठरला. अमला आणि इँग्रामनं दुसर्‍या विकेटसाठी 51 रन्सची पार्टनरशिप केली. पण 10 रन्सच्या अंतरात दोघंही आऊट झाले. डिव्हिलियर्स आणि डुमिनीनं भारतीय बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. दोघांनीही आपापली हाफ सेंच्युरी ठोकली. अखेर 244 रन्सवर दक्षिण आफ्रिकेच्या या दोघाही बॅटसमनची विकेट रोहित शर्मान घेतली. शेवटच्या ओव्हरमध्ये बोथा आणि पार्नेलनं चौफेर फटकेबाजी करीत दक्षिण आफ्रिकेला 50 ओव्हरमध्ये 290 रन्सचं टार्गेट गाठून दिलं. भारताची सुरूवात अडखळती झाली. मुरली विजय आणि सचिन तेंडुलरकर झटपट आऊट झाले. स्टेननं विजयला एलबी डबल्यू केलं तर टोस्तबेनं सचिनची विकेट काढली. सचिन अवघे 7 रन्स करू शकला. दूसरीकडे विराट कोहलीनं एकाकी झुंज दिली. वन डेतील 11 वी हाफ सेंच्युरी ठोकत त्यानं प्रयत्नांची शर्थ केली पण स्टेननं त्याची झुंज संपुष्टात आणली. विराट 54 रन्स वर आऊट झाला. भारताला पुर्ण 50 ओव्हरही खेळता आल्या नाहीत. 35.4 षटकात भारताची टीम ऑलआऊट झाली. आणि सीरिजमधील पहिल्या वन डेत भारताला 135 रन्सनं पराभव पत्कारावा लागला.

close