असीमानंद यांची महाराष्ट्र एटीएस चौकशी करणार

January 13, 2011 10:28 AM0 commentsViews: 1

13 जानेवारीसमझौता एक्सप्रेस स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या स्वामी असिमानंदची चौकशी आता महाराष्ट्र एटीएस करणार आहे. असिमानंदचा कबुलीजबाब बाहेर आल्यानंतर त्यात मालेगावचाही उल्लेख होता. त्यामुळं मालेगाव स्फोटाच्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी एटीएसचं खास पथक दिल्लीला जाऊन असीमानंदची चौकशी करणार आहे. 2007 मध्ये समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेता स्वामी असीमानंद यानं आपल्या गुन्ह्याची सीबीआयसमोर कबुली दिली. 2007 मध्ये समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 68 जणांचा मृत्यू झाला होता.

close