औरंगाबादमध्ये महसूल कर्मचार्‍यांचं काम बंद आंदोलन

January 13, 2011 12:13 PM0 commentsViews: 4

13 जानेवारी

औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचार्‍यांनी आज काम बंद आंदोलन केलं. वैद्यकीय रजेवर असलेल्या अव्वल क्लार्क कामावर बोलावल्यानंतर हजर झाला नाही म्हणून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून कर्मचार्‍यांनी लेखणीबंद आंदोलन केलं. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सगळं काम बंद आहे. अव्वल कारकुनावरील निलंबनाची कारवाई तात्काळमागे घ्यावी या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटनेनं जिल्हाधिकार्‍यांची भेटही घेतली. कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. निलंबन मागे न घेतल्यास उद्याही काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.