पुण्यात बीआरटीच्या प्रश्नावर शिवसेना जनमत चाचणी घेणार

January 13, 2011 12:23 PM0 commentsViews: 5

13 जानेवारी

पुण्यामध्ये एकूण 27 रस्त्यांवर बीआरटी करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. वादग्रस्त ठरलेल्या बीआरटीमुळे नागरिकांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे या मुद्दयावर विरोधी पक्षात बसलेली शिवसेनाही सरसावली. या मुद्यावर शिवसेनेनं जनमत चाचणी घेण्याचं ठरवलंय. त्यासाठी पक्ष प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी पत्रकार परिषद घेतली.

close