‘माणसांच्या हल्ल्ल्यात’ बिबट्याचा बळी

January 13, 2011 12:29 PM0 commentsViews: 1

13 जानेवारी

वन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष थांबण्याची चिन्ह दिसत नाही. पुन्हा एकदा एक बिबट्या माणसांच्या हल्ल्ल्याचा बळी ठरला ही घटना आहे.ओरिसातल्या भुवनेश्वर परिसरातली. वाट चुकून आलेल्या एका बिबट्याला गावकर्‍यांनी लाठ्याकाठ्यांनी बडवून काढलं. त्यात या बिबट्याचा मृत्यू झाला. गावकरी त्वेषानं या बिबट्यावर तुटून पडले आणि त्याला ठार मारलं. त्यानंतरही त्यांचा संताप आवरला नाही आणि मृत बिबट्याला क्रूरपणे वागवत, त्याचा मृतदेह एक बिल्डिंगवर टांगण्यात आला.

close