तणावाच्या वातावरणात कोल्हापुरात विश्वशांती यज्ञाला सुरवात

November 3, 2008 3:48 AM0 commentsViews: 2

3 नोव्हेंबर, कोल्हापूरकोल्हापुरात होत असलेल्या विश्वशांती महायज्ञाला 'आम्ही भारतीय लोक' आंदोलनानं कडाडून विरोध केला आहे. पण असं असतानाही या यज्ञाला सुरुवात झाली आहे. पूर्णपणे कर्मकांडावर आधारीत असलेला हा यज्ञ घटनाविरोधी, विज्ञान विरोधी आणि अंधश्रद्धा निर्माण करणारा आहे. त्यामुळे सुरुवातीपासून याला विरोध हो आहे. पण हिंदुत्ववादी संघटनेनं कोणत्याही परिस्थितीत हा यज्ञ करणारच असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तणावाच्या वातावरणात यज्ञाच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. यज्ञ समितीच्या वतीनं शहरात शोभायात्रा काढण्यात आली. काल संध्याकाळी या यज्ञाला विधिवत सुरवात झाली आहे. पण यज्ञविरोधी लोक आंदोलनानं यज्ञस्थळावर दररोज निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे, कोल्हापूर शहरात तणावाचं वातावरण आहे.

close