शिक्षणसेविकेला तडकाफडकी काढलं !

January 13, 2011 3:19 PM0 commentsViews: 9

अलका धुपकर, मुंबई

13 जानेवारी

अनेक आंदोलन होऊनही शिक्षणसेवकांचे प्रश्न कायम आहेत. मुंबईतल्या चिकित्सक समूहाच्या शिरोळकर हायस्कूलमधून एका शिक्षणसेविकेला कामावरुन तडकाफडकी काढण्यात आलं. शाळा व्यवस्थापनानं कर्मचार्‍यांचा अपंग कोटा भरला नाही. त्यामुळे शिक्षणसेविकाला कायम केलं नाही असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. तर अपंग कोटा का भरला नाही, याचं स्पष्टीकरण देण्याऐवजी शाळा व्यवस्थापन या प्रकाराची जबाबदारी शिक्षण विभागावर टाकत आहेत. स्वत:च्या मेरीटवर ताराबाई मोडक कॉलेजमधून डीएड केलेली आरती पवार सध्या न्यायासाठी लढत आहे.

गिरगावच्या शिरोळकर हायस्कूलमध्ये जानेवारी 2010 मध्ये तिला शिक्षणसेवक म्हणून रीतसर पत्र देण्यात आलं. मुलाखत आणि लेखी परीक्षेनंतर तिची निवड झाली होती 2013 पर्यंत म्हणजे तीन वर्षांसाठी तिची अपॉईटमेंट होती. नियमानुसार तीन वर्ष तिची सेवा पूर्ण झाली असती तर ती शिक्षक पदावर कायम होऊ शकली असती. पण जून महिन्यातच शाळेने तिला कामावरुन काढून टाकलं. आरतीच्या अपॉईंटमेंटला शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी मंजुरी दिली नाही, असा दावा शाळा करतेय. करिअर घडवणारी शिक्षणसेवकाची ही नोकरी. पण व्यवस्थापन आणि अधिकार्‍यांच्या वादामुळे तिला नोकरी गमवावी लागली.

close