पुणे फिल्म फेस्टिव्हलचा शानदार समारोप

January 13, 2011 4:35 PM1 commentViews: 3

13 जानेवारी

9 व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा आज पुण्यात शानदार समारोप सोहळा पार पडला. या समारोप सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान तसेच नाट्य आणि सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विजय चव्हाण यांच्या फोल्क ड्रम्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमाने या समारोप सोहळ्याची सुरुवात झाली. सिनेमाच्या अनेक विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार दिले गेले. उत्कृष्ट पटकथेसाठी तार्‍यांचे बेट साठी किरण यज्ञोपवित आणि सौरभ भावे यांना पुरस्कार देण्यात आला. तर आघातसाठी मुक्ता बर्वे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विक्रम गोखले यांना पुरस्कार मिळाला.सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी संत तुकाराम ऍवॉर्ड बाबू बँड बाजा या सिनेमाला मिळाला.

  • sonal

    पिफ्फ चा महोस्तव म्हणजे पुणेकरांची चक्क फसवणूक आहे.केवळ कोथरूड ला योग्य न्याय दिला जात आहे.सिंहगड रोड अभिरुची इथे गेली दोन दिवस एकही चित्रपट नीट लागला नाही. अनेक चित्रपट रद्द करण्यात आले आहेत.पिफ्फ च्या ऑफिसमधून बालिश कारणे सांगितली जात आहेत.भाडोत्री volunteer सर्व कामे बघतात,ज्यांना काही कळत नाही.पिफ्फचा एकही ऑफिशिअल माणूस इथे हजर नसतो.वार्ताहर पाठवून खात्री करावी हवी असल्यास.अनेक रसिक वैतागून परत जात आहेत,त्यात परकीय नागरिकदेखील आहेत.निव्वळ पुण्याची बदनामी आहे ही.

close