महागाई रोखण्यासाठी साठेबाजांवर कडक कारवाई होणार

January 13, 2011 4:47 PM0 commentsViews: 3

13 जानेवारी

वाढत्या महागाईवर सलग दोन दिवस चर्चेचं गुर्‍हाळ सुरु राहिल्यानंतर अखेर आज केंद्र सरकारनं ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. अन्न-धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा अनधिकृत साठा करणारे विक्रेते आणि दलालांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी यासंदर्भातली सर्व सूत्रं पंतप्रधान कार्यालयानं स्वतःकडे घेतली आहेत. त्यासाठी गेले दोन दिवस अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, कृषीमंत्री शरद पवार आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलूवालिया यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती.

close