बेस्टची बस जळून खाक

January 13, 2011 5:18 PM0 commentsViews: 3

13 जानेवारी

मुंबईत सीएनजी गॅसच्या गळतीमुळे आग लागून बेस्टची बस संपूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण एक प्रवासी आज सकाळी बेस्ट बसला अचानक आग लागल्यानं प्रकाश एम सोळंकी हे वीस टक्के भाजले. अंधेरीहुन हुतात्मा चौकाकडे जाणार्‍या बसला सीएनजी गॅसच्या गळतीमुळे आग लागली होती. जवळच्या अग्नीशमन दलाला बोलावल्यानंतर ही आग लगेचचं विझवण्यात आली. यामध्ये बस जवळपास पुर्ण जळाली.

close