अहमदनगरमध्ये पहिला कम्युनिटी रेडिओ सुरू

January 13, 2011 2:30 PM0 commentsViews: 5

13 जानेवारी

अहमदनगर शहरात रेडलाईट एरियातला पहिला कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यात आला आहे. वंचित, उपेक्षितांचा आवाज या रेडिओवरून मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्नेहालय संस्थेच्या वतीनं सेक्स वर्कर्स हा कम्युनिटी रेडिओ चालवणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते या रेडिओचं उद्घाटन करण्यात आलं. वेश्या व्यवसायातलं दु:ख इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आणि अल्पवयीन मुलींना यात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न या महिला या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून करणार आहेत.

close