नांदेडमधल्या गुरू-ता-गद्दी सोहळ्यात सरकारला कोट्यावधींचा फटका

November 3, 2008 4:18 AM0 commentsViews: 29

3 नोव्हेंबर, नांदेडसंदीप काळेनांदेडच्या गुरू-ता-गद्दी सोहळ्यासाठी ऊभारण्यात आलेल्या तात्पुरत्या तंबूंसाठी सरकारचे सुमारे 51 कोटी रूपये खर्च झाले आहेत. पण तिकडे कोणी फिरकलंच नाही , त्यामुळे हे पैसे वाया गेले आहेत. ऐतिहासिक गुरू-ता-गद्दी सोहळ्यासाठी 20 ते 25 लाख भाविक येतील, अशा अंदाज प्रशासनाने बांधला. त्यासाठी सुमारे 51 कोटी खर्च करून तात्पुरते कॅम्प्‌स बांधले पण प्रत्यक्षात फक्त 50,000च्या आसपासच भाविक आले.मातासाहेब, नानकसर, कौठा आणि नेरली या चार कॅम्पस्‌वर लाखो रूपये खर्च होत आहेत. छोट्या आणि मोठ्या तंबूंसाठी 20 कोटी रुपये खर्च झाला आहे. आडव्या तंबूंसाठी 10 कोटी रुपये, 40,000 लाईट ट्युबस साठी 90 लाख रूपये, 20, 000 संडास बांधणीसाठी 5 कोटी रूपये खर्च झाले आहेत. रस्त्यांसाठी 10 कोटी, तर पाणीपुरवठ्यासाठी 3 लाख रूपयांचा खर्च झाला आहे. कॅम्पच्या जागाभाड्यासाठी 5 कोटींचा बोजा पडला आहे. पण भाविक इकडे न फिरकल्यामुळे यातला बराचसा खर्च वाया गेला आहे. पालकमंत्री मात्र या खर्चाचं समर्थन करत आहेत. ' आपण आपल्या बाजूनं तयारी करून ठेवलेली चांगली, लोक आले नाहीत हे आपलं दुदैर्व, पण आलेल्या भाविकांना उत्तम सोयी पुरवणं ही आमची जबाबदारी होती आणि त्या दृष्टीनं आम्ही चांगलं काम केलं ' अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.या सगळ्यांव्यतिरिक्त हजारो सरकारी, आरोग्य कर्मचारी तसच पोलिसांचा रोजचा खर्च आहेच. 1700 कोटींच्या निधीमुळ नांदेडचा काही प्रमाणात विकासही झाला. पण प्रशासनाच्या चुकीमुळे कोट्यवधींचा फटकाही सरकारला बसला.

close