असीमानंद यांनी दिली स्वेच्छेने बॉम्बस्फोटाची कबुली

January 13, 2011 5:40 PM0 commentsViews: 8

13 जानेवारी

समझौता एक्सप्रेसच्या बॉम्बस्फोटात हात असल्याची कबुली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नेता स्वामी असिमानंद यानं सीबीआयपुढे दिली. ही कबुली त्यानं स्वत:च्या इच्छेनंच दिली अशी माहिती उघड झाली. असीमानंद यानं भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना पत्रं लिहिली होतं. आयबीएन-नेटवर्क आणि तहलकाला ही पत्रं मिळाली आहेत. त्यात असीमानंदनं कबुलीजबाब देण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपलं हृदयपरिवर्तन कसं झालं याची माहितीही त्यानं पत्रात दिली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विनाकारण अटक करण्यात आलेल्या एका मुस्लीम तरुणाला भेटल्यानंतर आपल्याला केलेल्या कृतीचा पश्चाताप झाल्याचं त्यानं म्हटलंय. असीमानंद याने ही पत्रं आपल्या भावाकडे दिली होती. पण दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडे ही पत्रं पोचलीच नाहीत. असीमानंदच्याच हस्ताक्षरातली ही पत्रं आहेत. ती 20 डिसेंबर 2010 ला लिहीण्यात आली होती. तर सीबीआयनं असीमानंदचा कबुलीजबाब 18 डिसेंबर 2010 रोजी रेकॉर्ड केला होता.दरम्यान, स्वामी असिमानंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचा तपास संपलाय. त्यामुळे एनआयए असीमानंदची कोठडी वाढवण्याची मागणी कोर्टाकडे केली नाही. दुसरीकडे असीमानंद याच्या कबुलीजबाबत मालेगाव स्फोटाप्रकरणी नवी माहिती समोर आली. त्यामुळे सीबीआयनं स्पेशल मोक्का कोर्टाकडे मालेगाव बॉम्बस्फोटाचा अधिक तपासाला परवानगी देण्याची मागणी केली. तशा प्रकारचा अर्ज सीबीआयनं कोर्टाकडे सादर केला. सीबीआयनं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजेच एसआयटीची स्थापना केली. याप्रकरणात आत्तापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली तर तिघेजण फरार आहेत.

close