मुंबई मॅरेथॉन चॅरिटीमध्येही अव्वल ; 8 कोटींचा मदतनिधी जमा

January 13, 2011 5:52 PM0 commentsViews: 2

13 जानेवारी

मुंबई मॅरेथॉन आशियातली सगळ्यात श्रीमंत मॅरेथॉन आहे. आणि चॅरिटीतही ही मॅरेथॉन नवे रेकॉर्ड रचत आहेत. येत्या रविवारी ही स्पर्धा होणार आहे. आणि यंदा आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदतनिधी मॅरेथॉनच्या निमित्ताने आतापर्यंत जमा झाला. शोभा डे, बॉलिवूड अभिनेत्री कुनिका, फिटनेस ट्रेनर मिकी मेहता, रवि त्रेहान यांच्यासारख्या 76 सेलिब्रिटीजनी विविध सेवाभावी उपक्रमांसाठी हा पैसा उभा केला. 185 समाजसेवी संस्था या मॅरेथॉनशी जोडलेल्या आहेत. मॅरेथॉन आणि ड्रीम रनमधून उभा राहणारा पैसा नक्की कुठे जातो, कशावर खर्च होतो असा प्रश्न नेहमी विचारला जातो. त्याला उत्तर म्हणून मदतनिधी उभारणार्‍या या सेलिब्रिटीजचं एक चर्चासत्र आज आयोजित करण्यात आलं होतं. प्रत्येक सेलिब्रिटीने ते काम करत असलेल्या संस्थेविषयी आणि उपक्रमांविषयी माहिती दिली. यातलेच एक होते एन शंकर रमणा. व्हीलचेअर इव्हेंटचे ते पहिले स्पर्धक आहेत. आणि अपंग लोकांच्या पुनर्वसनासाठी यावर्षी त्यांनी पाच लाख रुपये मॅरेथॉनच्या निमित्ताने जमा केले.

close