पानिपतच्या रणभूमीवर जागल्या शौर्याच्या आठवणी

January 14, 2011 10:04 AM0 commentsViews: 25

14 जानेवारी

14 जानेवारी 1761 रोजी मराठे आणि अहम्मद शहा अब्दालीमध्ये पानिपतची तिसरी लढाली झाली होती. या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला आणि सुमारे एक लाख मराठ्यांची कत्तल झाली. पण पराभव झाला तरीही परकीय शत्रूपासून देशाला वाचवण्यासाठी मराठे मोठ्या जिद्दीने लढले होते. म्हणूनच आज पानिपतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना सुरूवात झालीय. हरियाणा राज्यातल्या पानिपत शहराजवळ असलेल्या काला आम या लढाईच्या स्मारकाजवळ हे कार्यक्रम सुरू झाले आहेत. अनेक राजकीय नेत्यांसह देशभरातून तरूण मंडळीही इथं आले आहेत. यावेळी इथल्या कार्यक्रमांसाठी दाखल झालेल्या गोपीनाथ मुंडे आणि पांडुरंग बलकडवे उपस्थित होते.

250 वर्षांपूवीर्ंच्या या रणसंग्रामाच्या आठवणी आणि मराठ्यांची शौर्यगाथा जागवण्यासाठी पानिपतवर आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.5 नद्याचं पवित्र जल वापरून स्मृतीस्तंभावर अभिषेक करण्यात आला. राज्यातूनही अनेक जण तिथ गेले आहेत. आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून स्मृतीस्थळी आदरांजली वाहत आहेत. त्याचवेळी शूरांची गाथा गाणारी कवनं आणि पोवाडेही सादर होत आहेत.

close