येवला पतंग उत्सवासाठी सज्ज

January 14, 2011 10:15 AM0 commentsViews: 14

14 जानेवारी

पैठणीचं गाव समजलं जाणारं येवलाही आसारीवरच्या वैशिष्ट्यपूर्ण पतंग उत्सवासाठी सज्ज झालंय. येवल्यातल्या पतंगांचे वैशिष्ट्य म्हणजे फिरकीऐवजी वापरल्या जाणार्‍या आसारी. हातमागावर पैठणी विणण्यासाठी वापरण्यात येणार्‍या आसारीवर मांजा गुंडाळून येवल्यात पतंग उडवण्यात येतात. या आसारी बनवण्याच्या कामाला बुरुड गल्लीत वेग आला. पूर्वी हातमागावरच्या जड आसारीच पतंग उडवण्यासाठी वापरल्या जायच्या. पण आता खास पतंगांसाठी हलक्या आसारी तयार करण्यात येतात. बदलत्या काळाप्रमाणे मुन्नी, शिला आणि दबंगच्या पतंग आणि हातमागावरच्या आसारी असा नव्याजुन्याचा अनोखा संगम येवल्यात पाहायला मिळतो.

close