लाच मागणार्‍या क्लार्कला बच्चू कडू यांनी झोडपले

January 14, 2011 11:22 AM0 commentsViews: 19

14 जानेवारी

मंत्रालयात आरोग्य विभागाच्या क्लार्कला आमदाराने चोपल्याचा प्रकार घडला आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या आरोग्य विभागाच्या क्लार्कला मारहाण केली. या क्लार्करनं लाच मागितल्यानं आपण त्याला मारहाण केली असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. वैद्यकीय अधिकारी भरतीवेळी कडू यांच्याकडे ही लाच मागण्यात आली होती. दरम्यान आमदार बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. सरकारी कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.आरोग्य विभागातले क्लार्क चंद्रवदन हगवणे यांनी ही तक्रार दाखल केली. आमदार कडू यांनी याच हगवणेंना मारहाण केली होती.

close