मला मारहाणीचा आदेश गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच – जाधव

January 14, 2011 11:59 AM0 commentsViews: 8

14 जानेवारी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला अशी मारहाण झाली असती तर सरकारन कारवाईला इतका वेळ लावला असता का ? असा सवाल करीत पाऊण तास पोलिस ठाण्यात ठेवल्यानंतर मला मारहाण झाली आणि पोलिसांचा राग कमी होण्याऐवजी तो वाढतच गेला याचाच अर्थ गृहमंत्री आर आर पाटील आणि प्रशासनावर पकड असणार्‍या अजित पवारानीच हा आदेश दिला असणार असं प्रत्युत्तर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अजित पवारांना दिलं. राज ठाकरे यांनी आरोप करण्यापेक्षा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माझ्यावर आरोप करावेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या सभेनंतर दिली होती. आमदार जाधव यांनी साई रूग्णालयातून डिस्जार्ज घेऊन आता पुढील उपचार पुण्यात घेण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी साई रूग्णालयातून घरी परतल्यानंतर आमदार जाधव यांनी आयबीएन लोकमतला ही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी केलेले विधान शंभर टक्के खरे असून अशाप्रकारची मारहाण काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना झाली असती तर सरकारने हिच भूमिका घेतली असती काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माझ्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत असं स्पष्टीकरणही आमदार जाधव यांनी केलं.

close