अनेक पराभवामुळे राज ठाकरेंचे आरोप – मेटे

January 14, 2011 1:14 PM0 commentsViews: 24

14 जानेवारी

महाराष्ट्रात आम्हाला दमबाजी करणारे अजून जन्माला यायचे आहेत अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटेंनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं. अनेक पराभवानंतर राज यांच्यात उदासिनता आल्यानं ते जातीयवादाचे आरोप करू लागले आहेत. तसेच राज यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. वेळ आली तर सामना करायला सज्ज आहोत. असंही विनायक मेटे म्हणाले. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे निषेध सभा घेऊन गृहमंत्री आर आर पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले होते तसेच संभाजी बिग्रेडवर पण चांगलाचं हल्ला चढवला होता. याला विनायक मेटे यांनी अशा शब्दातउत्तर दिलं.

close