कल्याण-मुरबाड रोडवर बसला अपघात, 30 जण जखमी

November 3, 2008 2:51 AM0 commentsViews: 14

3 नोव्हेंबर, मुंबईठाणे जिल्ह्यातल्या कल्याण – मुरबाड रोडवर मामनोली इथं एक लक्झरी बस उलटल्याने 30 प्रवासी जखमी झाले. ही बस मुंबईकडे लग्नाचं वर्‍हाड घेऊन येत असताना रात्री हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. जखमी प्रवशांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

close