ऍम्बी व्हॅली बलात्कार प्रकरणी सिक्युरिटी गार्डला अटक

January 14, 2011 2:44 PM0 commentsViews: 6

14 जानेवारी

काही दिवसांपूर्वी पुण्यात खळबळ उडवून देणार्‍या ऍम्बी व्हॅलीप्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. एका मल्टीनॅशनल कंपनीच्या महिला कर्मचार्‍यावर बलात्कार झाल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. सिक्युरिटी गार्डनचं बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. धर्मेंद्रकुमार चौधरी असं या सिक्युरिटी गार्डचं नाव आहे. या सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात आली.पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.

पीडित महिला मुळची मुंबईची असून ती पुण्यात एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते. ऍम्बी व्हॅलीतील एका रिसॉर्टमध्ये या मल्टीनॅशनल कंपनीच्या अधिकार्‍यांची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला या महिलेसह अडीचशे अधिकारीही उपस्थित होते. शनिवारी रात्री हे सगळेजण रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असतानाच बलात्काराची ही घटना घडली.

close