इको सेन्सीटीव्ह झोनबाबत मत परिवर्तनासाठी परिषद

January 14, 2011 4:21 PM0 commentsViews: 5

14 जानेवारी

राज्यभरातुन इको सेन्सीटीव्ह झोन आणि व्याघ्र प्रकल्पाला विरोध होतोय. त्यामुळे पर्यावणप्रेमींनी ठिकठिकाणी इको सेन्सीटीव्ह झोनबाबात परीषद घेवुन लोकांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही इको सेन्सीटिव्ह झोनला विरोध होतो. त्यामुळे इको सेन्सीटिव्ह झोन समर्थक आणि विरोधक आपापल्या मतावर ठाम आहेत.पण इको सेन्सीटीव्ह झोन झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन कसे राहणार आहे हे पर्यावरण प्रेमी विविध माध्यमातुन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मलाकापुरमध्ये प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय इको सेन्सीटीव्ह परीषद घेण्यात आली. यामध्ये इको सेन्सीटीव्हचे फायदे सांगण्यात आले. त्याचबरोबर इको सेन्सीटीव्हला विरोध करणार्‍यांचा कडाडुन विरोध करण्यात आला.

close