सोलापूरमध्ये सिद्धेश्वरच्या यात्रेला सुरुवात

January 14, 2011 4:25 PM0 commentsViews: 1

14 जानेवारी

सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वरच्या यात्रेला मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनं आज सुरूवात झाली. कसब्यातल्या मल्लिकार्जुन मंदिरापासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक निघाली. पांढर्‍या शुभ्र वेशातले शैव पंथीय युवक सोलापूरकरांचं लक्ष वेधून घेत होते. यावेळी संस्कार भारती आणि कलासंगमच्या वतीनं मिरवणूक मार्गावर सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. दुपारनंतर होणार्‍या अक्षता सोहळ्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागल आहे.

close