ब्राझीलमध्ये अचानक आलेल्या पुरात 350 जणांचा मृत्यू

January 14, 2011 4:29 PM0 commentsViews: 5

14 जानेवारी

ब्राजीलमध्ये अचानक डोंगर खचल्यानं आणि पूर आल्यानं 350 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. मदतकार्यात अनेक जणांचे प्राणही वाचवण्यात आले. या पूरात अडकलेली एक महिला अतिशय आश्चर्यकारकरित्या बचावली. पूराचं पाणी एवढं वाढलं की ती आपल्या कुत्र्यासह घराच्या छतावर गेली. पण पूर वाढतच होता आणि शेजारच्या बिल्डिंगमध्यला लोकांनी तिच्यापर्यंत दोरी फेकली. कुत्र्याला खांद्यावर घेवून ती वर जाऊ लागली. अखेर तिला वाचवण्यात यश आलं पण दुदैर्वानं तिचा कुत्रा मात्र वाचु शकला नाही.

close