देशभरात मकरसंक्रातीची धूम

January 14, 2011 5:39 PM0 commentsViews: 7

14 जानेवारी

देशभरात मकरसंक्रातीला सुरुवात झाली. संक्रांत म्हटलं की वेगवेगळे रंग आणि आकाराचे पतंग आपल्यासमोर उभे राहतात. नागपूरमध्ये लाईट्सचा पतंग तयार करण्यात आला आहे या पतंगला तब्बल 3 हजार लाईटसची माळ आहे. हा पतंग उडवण्यासाठी अनेकांची मदत घ्यावी लागली आणि अखेर 3000 लाईट्स घेऊन हा पतंग उंच उडाला. हे लाईट्स लावण्यासाठी जनरेटरची व्यवस्थासुद्धा करण्यात आली होती.

तसेच मकरसंक्रतीच्या निमित्तानं अनेक जण पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. त्यांच्या पसंतीला उतरणारे वेगवेगळ्या प्रकारचे पतंगही बाजारात विक्रसाठी आलेले आहेत. यात खास करून वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळी चित्र असणारे पतंग आपल्याला पाहायला मिळतात. यंदा बाजारात मुन्नी, दबंग आणि शीला या नट नट्यांच्या पतंगाची मागणी जास्त होत आहे.

तर दक्षिण भारतात खासकरून तामिळनाडूत पोंगल साजरा केला जातो. चार दिवसांचा हा सण आहे. सूर्याचं उत्तरायण सुरू झाल्यानंतर या सणाला सुरुवात होते. स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करून आणि कोलमची नक्षी काढून हा सण साजरा केला जातो. तसेच आसाममध्ये बिहू या सणाचा उत्साह आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं आसामच्या खोर्‍यात हा सण साजरा केला जातो. भोगली बिहू हा माशांपासून खास खाद्यपदार्थ यानिमित्तानं बनवला जातो. मासे महाग झाले असले तरी लोकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाहीय.

close