पृथ्वी महोत्सव सत्यदेव दुबेजींना समर्पित

November 3, 2008 5:39 AM0 commentsViews: 3

2 नोव्हेंबर, मुंबई माधुरी निकुंभ2008चा 30वा पृथ्वी फेस्टिव्हल सत्यदेव दुबेंना समर्पित केला आहे. 6 ते 16 नोव्हेंबर चालणा-या या फेस्टिव्हलची सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून पृथ्वीचे लोक प्रचार करायला लागले आहेत. प्रचारकांचा उत्साह आणि मेहनत फक्त एकाच गोष्टीसाठी आहे आणि तीही पृथ्वी फेस्टीव्हलच्या प्रचारासाठी. जर हा प्रचार नीट झाला तर जास्तीत जास्त लोकांना पृथ्वी फेस्टिव्हलची माहिती होईल हा त्यामागचा हेतू आहे. या सगळ्या धडपडीतुन एकच गोष्ट साध्य होणार आणि ती म्हणजे भरपूर लोकांपर्यंत नाटकाची माहिती पोहोचणार आणि त्या सगळ्यांची पाऊलं या फेस्टिव्हलच्या काळात आपसुकच दुबेजींची नाटकं बघायला वळणार.सगळ्यांसमोर ओपन एअर परफॉर्मन्स देताना अनेक अडचणी येतात पण असं करण्यातही एक अनोखी धुंदी असते हे यांच्याकडे बघितल्यावर जाणवतं.

close