शबरीमला चेंगराचेंगरीत 102 ठार

January 15, 2011 8:32 AM0 commentsViews: 20

15 जानेवारी

केरळमधल्या शबरीमला मंदिराजवळ काल झालेल्या चेंगराचेंगरीत 102 भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक भाविक जखमी झालेत. यात महाराष्ट्रातलेही अनेक भाविक आहेत. शबरीमला यात्रेसाठी लाखो भाविक आले आहेत. यात्रेकरूंच्या एका जीपचा अपघात झाला. या अपघातानंतर भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. तसेच पळापळ सुरु झाली. यातूनच ही दुर्घटना घडली. मकर ज्योती हा उत्सव करुन भाविक परत येत होते. आतापर्यंत 49 मृतदेहांची ओळख पटली आहेत. मृतांमध्ये तामिळनाडूतल्या यात्रेकरुंची अधिक संख्या आहे. या चेंगराचेंगरीत बेळगावच्या 10 जणांचा समावेश आहे. घटनास्थळी लष्करी जवान आणि नौदलाचे जवान मदतकार्यात सहभागी झालेत. दरम्यान पंतप्रधान फंडातून मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख तर जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपयांची आणि जखमींसाठी 20 हजार रुपयांची मदत जाहीर केली. तर केरळ सरकार आणि शबरीमला देवस्थानानं संयुक्तरित्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये. गंभीर जखमींना 50 हजार आणि किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली. या चेंगराचेंगरीची न्यायधिशामार्फत चौकशी केली जाणार आहे. याबद्दल लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान केरळमध्ये तीन दिवसांचा दुखवटाही पाळण्यात येणार आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनानं हेल्पलाईन नंबर जाहीर केले

शबरीमला कंट्र्‌ोल रुम (कुमली):- 04869 : 22-20-49

वेंदी-पेरिमार ( अपघातग्रस्त परिसर)04869 : 25-22-4404869 : 25-34-56

बंगळुरूसाठी फोन नंबर080 : 22-21-17-77 टोल फ्री नंबर- 18004250100

close