अहमदाबादमध्ये ‘कोडा’ला पसंती

January 15, 2011 8:15 AM0 commentsViews: 2

15 जानेवारी

पतंग उडवणं म्हणजे फक्त लहान मुलांचा खेळ आहे असं जर समजत असाल तर हा समज अहमदाबादकरांनी साफ खोटा ठरवला. मकरसंक्रांतीसाठी त्यांनी जय्यत तयारी केली. रायपूर दरवाजा भागातला बाजार रात्रीही सुरु असतो. पतंग, मांजा आणि फिरकी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. 20 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंतचे वेगवेगळ्या व्हरायटीचे पतंग इथे मिळतात. पण लोकांची जास्त पसंती असते कोडा खरेदीला. कोडा म्हणजे 20 पतंगाचा एक सेट. या कोड्याची खासियत म्हणजे तुम्ही पसंत केलेला कोडा हा तुम्हाला उघडून पहाता येत नाही. जो कोडा मिळाला तो आपला. चांगला- वाईट ते तुमचं नशिब अशी पद्धत अहमदाबादमध्ये आहे.

close