पराभवाचा वचपा काढण्यासाठी टिम इंडिया सज्ज

January 15, 2011 9:28 AM0 commentsViews: 9

15 जानेवारी

द.आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्सवर आज भारत आणि द. आफ्रिकादरम्यान दुसरी वन डे रंगणार आहे.पहिल्या वनडेतला मोठा पराभव भारताच्या जिव्हारी लागला. त्यामुळे भारतीय खेळाडू त्वेषाने खेळतील अशी क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे. तर याच मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या 434 स्कोअरला चेस करत द. आफ्रिकेनं रेकॉर्ड रचत 2006 साली मॅच जिंकली होती. त्यावेळी आफ्रिकेनं 438 रन्स केले होते. दुसरीकडे याच मैदानावर धोनीच्या यंग ब्रिगेडने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. आधीच पाटा पीच त्यात वेगवान आऊटफिल्ड त्यामुळेच आजच्या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मॅच सुरु होणार आहे.

close