पंडित भिमसेन जोशी यांची प्रकृती चिंताजनक

January 15, 2011 11:26 AM0 commentsViews: 170

15 जानेवारी

स्वरभास्कर भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांची प्रकृती चिंताजनक आहे. भिमसेन जोशींना ट्रिटमेंट देणारे सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंडित भिमसेन जोशी यांना 31 डिसेंबरला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं. त्यानंतर त्यांना गेल्या तीन दिवसांपासुन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची किडनी तसेच फ्फुफुसं ही फेल झाली आहेत. तसेच किडनीला इन्फेक्शन झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, पंडितजींची भेट घेण्यासाठी बांधकाम-मंत्री छगन भुजबळ आज सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आले होते. पंडितजींना भेटल्यानंतर आपण डॉक्टरांशी चर्चा केल्याचं भुजबळांनी सांगितलं.

close