‘बाई’ मी पतंग उडवीत होते..

January 15, 2011 11:37 AM0 commentsViews: 1

15 जानेवारी

मकरसंक्रातीच्या निमित्तानं महिलांना पतंग उडवता यावा यासाठी नागपूरमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी ऍकेडमी फॉर स्पोर्ट्स ऍन्ड कल्चर या संघटनेच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. पारंपारिक वेषभूषा परिधान करून महिलांनी या पतंग स्पर्धेत भाग घेतला. जवळपास अडीचशे महिलांनी या स्पर्धेत जल्लोषात सहभाग घेतला. त्यामुळे रविनगरच्या या मैदानावर 'ओ काट' चा एकच आवाज एैकू येत होता. यावेळी डीजेच्या तालावर महिलांनी नृत्य करून या स्पर्धेचा चांगलाच आनंद लूटला.

close