लाच मागणार्‍या कर्मचार्‍याचे अखेर निलंबन

January 15, 2011 11:52 AM0 commentsViews: 24

15 जानेवारी

आमदार बच्चू कडू यांनी मारहाण केलेल्या क्लार्क चंद्रवर्धन हगवणे याच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्राथमिक चौकशीत हगवणे दोषी आढळल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. हगवणे हे आरोग्य खात्याचे क्लार्क आहेत. अप्पर मुख्य सचिव आरोग्य विभाग जयंतकुमार बांटीया यांनी हे निलंबनाची कारवाई केली. काल आमदार बच्चू कडू यांनी लाच मागितल्यामुळे हगवणे यांना मारहाण केली होती. हगवणे यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. काल हगवणे यांनी आ. बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी मारहाण केल्याच्या निषेधात कर्मचार्‍यांनी दोन तास कामबंद आंदोलन केलं होतं. आज कर्मचार्‍यांनी त्याचाच निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम केलं. आज कर्मचारी विधानसभा अध्यक्षांना भेटून बच्चू कडूंवर कारवाईची मागणी करणार आहेत.आरोग्य विभागातले क्लार्क चंद्रवदन हगवणे यांनी तक्रार दाखल केली होती.

close