अकोल्यात राज ठाकरे यांचा पुतळा जाळला

January 15, 2011 12:11 PM0 commentsViews: 3

15 जानेवारी

आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी आणि मनसे मधील संघर्ष टोकाला गेला आहे. आज यांच संघर्षाचा भडका उडाला आहे. राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादी वरील टीका प्रकरणी संतप्त कार्यकर्त्यानी अकोला येथील बस स्टॅन्ड चौकात आज राज ठाकरे यांचा पुतळा जाळला. दरम्यान पुतळा विझविण्याकरता गेलेला एक पोलिस शिपाई ही जखमी झाला आहे. जखमी पोलिस शिपायाला उपचारार्थ दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. याला उत्तर देण्याकरिता म.न.से कार्यकर्त्यानी विनायक मेटे यांच्या नावाचा बोर्ड गाढवाला लावून चप्पलांचा हार घातला आणि विनायक मेटे विरुध्द घोषणा दिल्या. मात्र दोन्ही प्रकरणात अध्याप क ोणावरही कारवाई करण्यात आली नाही.

close