विना हेल्मेट वाहनचालकांना पावती ऐवजी गुलाबाचं फूल !

January 15, 2011 12:42 PM0 commentsViews: 5

15 जानेवारी

वसई पारनाका इथं वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी केली. हेल्मेट न वापरणार्‍या वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबाची फूल दिली. तसेच वाहतूक नियम मोडत असल्याची वाहनचालकांना जाणीव करुन दिली. मात्र बाजारात चांगल्या दर्जाचे हेल्मेट मिळत नसल्याची तक्रार वाहनचालकांनी केली. पोलिसांच्या या जनजागृतीची मोठी चर्चा होती.

close