अहमदाबादमध्ये पतंगांच्या मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी

January 15, 2011 12:59 PM0 commentsViews: 3

15 जानेवारी

पतंगांच्या मांज्यामुळे अहमदाबाद शहरामध्ये अनेक पक्षीही जखमी झाले. पांजरपोळ इथल्या हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी पक्ष्यांवर आवश्यकतेनुसार उपचार सुरु आहेत. जखमी झालेल्या घारीवर आणि घुबडावर इथं उपचार सुरु आहेत. या पक्ष्यांवर ऑपरेशन करण्याची सोयही इथं उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसात आता पर्यंत 650 जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आलेत. देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून इथं डॉक्टर आलेले आहेत. अगदी आसामधूनही डॉक्टर दाखल झाले आहेत. त्याचबरोबर अहमदाबाद शहरामध्ये जवळ जवळ 2000 स्वयंसेवक जखमी पक्ष्यांना वाचवण्याची कार्यरत आहेत. या मदतकार्यात श्रीलंका आणि लंडनचेही स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

close