पेट्रोलच्या दरात 2.54 पैशाने वाढ

January 15, 2011 1:40 PM0 commentsViews: 4

15 जानेवारी

महागाईनं त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. पेट्रोल पुन्हा एकदा महाग झालं. पेट्रोलच्या किंमतीत 2 रुपये 50 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारी पेट्रोल कंपन्यांनी केला. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होईल. महिन्याभरातली ही दुसरी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्यानं ही दरवाढ होत आहेत. इंडियन ऑयलनं दरात 2 रुपये 50 पैशांची वाढ केली. हिंदुस्तान पेट्रोलियमनं 2 रुपये 54 पैसे तर भारत पेट्रोलिमनं 2 रुपये 53 पैशांची दरवाढ केलीय. या तिन्ही कंपन्यांनी गेल्याच महिन्यात पेट्रोलच्या दरात 2 रुपये 94 पैशांची वाढ केली होती.

शहरजुना दरनवा दर मुंबई60.31 62.81पुणे60.28 62.78

नाशिक60.05 62.55नागपूर59.54 62.04औरंगाबाद59.43 61.93

close