दारु पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द – गृहमंत्री

January 15, 2011 2:13 PM0 commentsViews: 22

15 जानेवारी

दारु पिऊन गाडी चालवणार्‍यांनो सावधान कारण आता तुम्हांला नुसतं कारवाई किंवा दंडालाच सामोरं जावं लागणार नाही. तर आता लायसन्सच कायमचं रद्द केलं जाणार आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पुण्यामध्ये आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. अशा स्वरुपाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रस्त्यावर अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या व्यक्तींना आता चौकशीसाठी पोलिसांकडे खेटे मारावे लागणार नाहीत उलट राज्य स्तरावर त्यांना सन्मानित करण्याचं धोरण सरकार स्वीकारणार असल्याचंही यावेळी आर. आर. पाटील यांनी सांगितलं.

close