मुंबई मॅरेथॉनचं काऊंट डाऊन सुरू

January 15, 2011 2:48 PM0 commentsViews: 1

15 जानेवारी

मुंबई मॅरेथॉन 2011 चं काऊंट डाऊन सुरू झालं. 16 जानेवारीला मुंबईत या मॅरेथॉनचं आयोजन होणार आहे. ऑस्ट्रेलियाची ऍथलिट कॅथी फ्रिमन यावर्षीच्या मॅरेथॉनची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असणार आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनसाठी विक्रमी नोंदणी झाली.

आठव्या मुंबई मॅॅरेथॉनची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाही वांद्रे वरळी सी-लिंक वरुन मॅॅरेथॉनपटूंना धावता येणार आहेआणि या मॅरेथॉनचं हेच सर्वात मोठं वैशिष्ठ आहे. सी-लिंक बरोबरच यंदाच्या मॅरेथॉनमध्ये आणखीही काही सरप्रायझेस आहेत.जगात दरवर्षी जवळजवळ 500 आंतराष्ट्रीय मॅरेथॉनचं होतात. त्यातल्या फक्त 12 मॅरेथॉनना आयएएएफचं हे गोल्ड मेडल मिळालं. या वेळेस रेकॉर्ड ब्रेकींग 38 हजार 400 स्पर्धकांनी मॅरेथॉनसाठी नोंदणी केली.

आशियातल्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या या मॅरेथॉन मध्ये बक्षिसांची रक्कमही या वेळी वाढवण्यात आली. यंदाच्या मॅरेथानमधील विजेत्या खेळाडूंना तब्बल दिड कोटीची बक्षिसं देण्यात येणार आहेत. मॅरेथॉन विजेत्या पुरूष आणि महिला ऍथलिटला 36000 अमेरिकन डॉलर असणार आहेत तर भारताच्या पुरूष आणि महिला विजेत्या ऍथलिटला 6,500 डॉलर बक्षीस असणार आहे. नेहमीच्या उत्साहाने मुंबईकर ही मॅरेथॉन यशस्वी करतील असा विश्वास आयोजकांना वाटतोय.

close