रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत राजस्थानचा ऐतिहासिक विजय

January 15, 2011 4:37 PM0 commentsViews: 4

15 जानेवारी

रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत राजस्थाननं इतिहास रचला. ऋषीकेश कानेटकरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या राजस्थाननं फायनलमध्ये आघाडीच्या जोरावर बडोद्याचा पराभव केला. रणजी ट्रॉफी जिंकण्याची राजस्थानची ही पहिलीच वेळ आहे. राजस्थाननं पहिल्या इनिंगमध्ये 394 रन्स केले. याला उत्तर देताना बडोद्याची टीम 361 रन्स करु शकली. त्यामुळे राजस्थानला पहिल्या इनिंगमध्ये 33 रन्सची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसर्‍या इनिंगमध्ये राजस्थाननं 341 रन्स केले. तर बडोद्याला 4 विकेट गमावत 28 रन्स करता आले. अखेर पहिल्या इनिंगमधल्या महत्वपूर्ण आघाडीच्या जोरावर राजस्थानला विजयी घोषित करण्यात आलं.

close