कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी संजय मोहिंद्रू यांना जामीन मंजूर

January 15, 2011 4:50 PM0 commentsViews: 2

15 जानेवारी

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी टी. एस. दरबारी यांच्यानंतर आता संजय मोहिंद्रू यांना जामीन मंजूर झाला. संजय मोहिंद्रू हे आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे जवळचे सहकारी आहेत. दरबारी आणि मोहिंद्रू या दोघांना सीबीआयनं 60 दिवसांच्या कोठडीत ठेवलं होतं. पण तरीही त्यांनी चार्जशीट मात्र दाखल केला नाही. त्यामुळेच कोर्टानं दोघांनाही जामीन दिला. दरम्यान कोर्टानं मोहिंद्रू यांना देशाबाहेर जाण्यावर आणि साक्षीदारांची भेट घेण्यावर बंदी घातली. 2009 मध्ये लंडनमधल्या क्वीन्स बॅटन रिलेत गैरव्यवहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे.

close