मुंबई मॅरेथॉनवर इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व

January 16, 2011 8:57 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी

2011 च्या मुंबई मॅरेथॉनवर यंदा इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व राहिलं. 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनमध्ये इथियोपियाच्या गिरमा असेफानं यंदाचं जेतेपद पटकावलं. त्याने 2 तास 9 मिनिट आणि 55 सेकंदाची वेळ नोंदवली. मुंबई मॅरेथॉनची ही विक्रमी वेळ ठरली. याआधी 2009 मध्ये केनेथ मुगेरानं 2 तास 11 मिनिटाची वेळ नोंदवली होती. पण आज हा रेकॉर्ड मागे पडला. तर दुसर्‍या क्रमांकावर इथियोपियाच्याच बोटेर सोगयेनं बाजी मारली. तिसरा क्रमांक मात्र केनियन धावपटूंनं पटकावला. केनियाच्या पॅट्रीक मुरि-युक्कीनं 2 तास 10 मिनिटं 1 सेकंदाची वेळ नोंदवली. या स्पर्धेला स्पर्धकांचा तुफान प्रतिसाद लाभला. तब्बल 38 हजार 40 हजार स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. महिला गटातही इथोपियाच्या कोरेन यालनं बाजी मारली. तीन 2 तास 26 मिनिटं आणि 56 सेकंदांची वेळ नोंदवली. महिला गटात हा रेकॉर्ड ठरला.

मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतातर्फे लिंगखोई बिनिंगनं बाजी मारली. गेल्या वर्षाच्या सातव्या मॅरेथॉनमध्येही बिनिंगनं बाजी मारली होती. बिनिंग आर्मी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा धावपटू आहे.

close