भाजी विक्रेत्यांनी न्याय मागण्यासाठी गृहराज्यमंत्र्यांचं दार ठोठावलं

January 16, 2011 9:39 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी

कोल्हापूरातील पाचबंगला परिसरातील भाजी विक्रेत्यांनी थेट गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरी जाऊन न्याय देण्याची मागणी केली. गेले 40 दिवस प्रशासन न्याय देत नाही म्हणून फेरीवाल्यांनी पहाटेपासून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरासमोर न्याय द्या अशा घोषणा दिल्या .सतेज पाटील यांनी फेरीवाल्यांना भेटून व्यवसायासाठी योग्य जागा सुचवण्यास सांगितले त्यानुसार फेरीवाले आणि प्रशासन यांची सोमवारी बैठक घेणार आहे. व्यवसाय बंद असल्यानं फेरीवाल्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

close