नांदेडमध्ये वीस हजार विद्यार्थ्यांनी एकत्र गायलं ‘महाराष्ट्रगीत’

January 16, 2011 9:46 AM0 commentsViews: 1

16 जानेवारी

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वर महाराष्ट्राचा हा कार्यक्रम नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडिअमवर घेण्यात आला. या समुहगान कार्यक्रमात वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गौरव गीतं सादर केली. यात 97 शाळांमधल्या मुलांचा सहभाग होता. सकाळीच सजून आलेले विद्यार्थी आणि अभिमानास्पद महाराष्ट्रगीत त्यामुळे वातावरण भारून गेलं होतं.

close