वनविभागाची वन्यजीव संरक्षणबाबत अधिकार्‍यांसाठी ट्रेनिंग आयोजित

January 16, 2011 9:55 AM0 commentsViews: 11

मुश्ताक खान,मुंबई

16 जानेवारी

वन्यजीव संरक्षण कायदा झाला पण अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येतात. याबद्दलच वनविभागाच्या आणि कस्टम्सच्या अधिकार्‍यांसाठी मुंबईत खास ट्रेनिंग आयोजित करण्यात आलं होतं. क्राऊड मॅनेजमेंटबद्दलही इथं माहिती देण्यात आली.

कळपात फिरणारे हत्ती, पाणवठ्याजवळ हमखास दिसणारे वाघ या प्राण्यांच्या संरक्षणासाठी पावलं उचलली जात आहे. तरीही त्यांची शिकार होतेच आहे. अशा परिस्थितीत कायदाचा आधार कसा घ्यावा याबद्दल मुंबईत वनविभागआणि कस्टम्सच्या अधिकार्‍यांसाठी ट्रेंनिगचं आयोजन करण्यात आलं होतं. वन्यजीवांसाठी काम करणार्‍या ट्राफिक या संस्थेनं यावेळी वन्यजीवांचं महत्त्वंही सांगितलं.मानव आणि वन्यप्राण्यांच्या संषर्घाबद्दलही यावेळी महत्त्वाची माहिती देण्यात आली. शहरात घुसलेल्या प्राण्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली नाही तर प्राण्याचे प्राण वाचवता येऊ शकतात. जर कराडमध्ये क्राऊड मॅनेजमेंट झालं असतं तर परिस्थिती वेगळी असती हेही ट्रॅफिकचे अध्यक्ष समीर सिन्हा यांनी सांगितलं.

प्राण्यांना अडकवण्यासाठी जमीनीमध्ये पुरुन ठेवलेला सापळा शोधून काढणार्‍या डिटेक्टरबद्दलही यावेळी माहिती देण्यात आली. याबद्दल देशभरातल्या अधिकार्‍यांमध्ये जागरुती झाली तर अनेक प्राण्याचे प्राण वाचवता येऊ शकतील.

close