भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 1 रननं थरारक विजय

January 16, 2011 7:54 AM0 commentsViews: 2

16 जानेवारी

भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान जोहान्सबर्गमध्ये रंगलेल्या दुसर्‍या वन डेत भारतानं थरारक विजय मिळवला. फक्त 1 रननं टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या भारताची बॅटिंग या मॅचमध्ये फ्लॉप ठरली. युवराज सिंग वगळता भारताच्या कोणत्याही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही.आणि युवराजच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 191 रन्सचं आव्हान ठेवलं. दक्षिण आफ्रिका त्यांच्या आवडत्या मैदानावर हे आव्हान सहज पार करेल असं वाटत असतानाच भारतीय बॉलर्सनी मात्र कमाल केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे कॅप्टन ग्रॅहम स्मिथनं एकाकी झुंज दिली. त्यानं 77 रन्स केले. पण मॅचच्या शेवटच्या क्षणी मुनाफ पटेलनं अगदी टिच्चून बॉलिंग करत भारताचा विजय साकार केला. मुनाफनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

close